देशातील काही राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या पाहता कोरोनाची दुसरी लाट पसरण्याची भीती व्यक होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आता पंतप्रधान कार्यालयात बैठक सुरू आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण या बैठकीला उपस्थित आहेत.
महाराष्ट्राशिवाय केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पंजाबमध्येही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. व्हायरसच्या जनुकीय रचनेसंदर्भात चाचणीसाठी महाराष्ट्र आणि केरळमधून ८०० ते ९०० नमुने पाठवण्यात आले आहेत, असे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
काही राज्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे. काही ठिकाणी नवीन स्ट्रेन आढळून आले आहेत. व्हायरसमध्ये म्युटेशन म्हणजे परिवर्तन होत असते, त्यातून नव्या स्ट्रेनची निर्मिती होते. महाराष्ट्रात करोना रुग्ण वाढीमागे करोनाचा नवा स्ट्रेन असू शकतो, असे महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले होते.
Comments
Loading…