in

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ

लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्र सरकारनं कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु केला आहे. असे असताना राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यवतमाळ, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर पाहिजे त्या पद्धतीने नागरिकांनी काळजी न घेतल्याने ही रुग्णाची संख्या वाढत जात आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे, मास्कचा वापर करणं गरजेचे झालं आहे.

यवतमाळ जिल्ह्यात पंधरा दिवसात 1706 कोरोना रुग्ण सापडले आहे. गेल्या पंधरा दिवसातील आकडेवारी जर बघितली तर जिल्ह्यात 1706 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. त्यातील 25 जणांचा गेल्या पंधरा दिवसात मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण हे यवतमाळ शहर तालुका भागातील आहे.यवतमाळ प्रमाणेच अकोल्यात देखील गेल्या 15 दिवसात 402 रुग्णांची वाढ झाली आहे.

तर अमरावतीमध्ये दररोज 100 पेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची लागण होत आहे.यावेळी त्यांनी वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता चिंता व्यक्त करत कोरोना नियम आता यापुढे सक्तीने पाळावे लागतील, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागतील असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला. तर, पुन्हा लॉकडाऊनला सामोरं जायचं नाही त्यामुळे नियम पाळा असेही त्यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

hasina begum | 18 वर्षानंतर पाकिस्तानच्या जेलमधून मायदेशी परतलेल्या हसीना बेगम यांचे निधन

श्रीराम फक्त तुमचे नाहीत… फारुख अब्दुल्लांनी सुनावलं