in ,

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या ८ हजारांचा पल्ला सोडेचना!

राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा झपाट्याने वाढत चालला आहे. आज सलग दुसऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आठ हजाराच्या पल्ल्याआड आहे. त्यामुळे राज्यासह आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच महाराष्ट्रावर लॉकडाऊनचे संकट घोघावतेय.

राज्यात आज ८ हजार ७०२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारच्या तुलनेत किंचित रुग्णसंख्या कमी झाली आहे. बुधवारी ८ हजार ८०७ करोनाबाधितांची नोंद झाली होती. मात्र असे असले तरी सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येने ८ हजाराचा पल्ला कायम ठेवला आहे.

राज्यात अजून ६४ हजार २६० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३ हजार ७४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत २० लाख १२ हजार ३६७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.कोरोनामुळे ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ८० रुग्णांचा मृत्यू झाला होता. सध्या महाराष्ट्रातील मृत्यूदर २.४४ टक्के एवढा आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४९ टक्के एवढे आहे.

पुण्यात ७६६ नवे रुग्ण

पुणे शहरात दिवसभरात ७६६ करोना बाधित रुग्ण आढळले. तर याच दरम्यान चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्याच दरम्यान ३९१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज अखेर १ लाख ९१ हजार ६९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

स्फोटक प्रकरण; मुंबई गुन्हे शाखा संपूर्ण प्रकरणाचा तपास करतेय- अनिल देशमुख

कृषीपंप वीज धोरण : 3 लाख शेतकऱ्यांनी भरली 312 कोटी रुपयांची थकबाकी