in

CoronaVirus : राज्यात आढळले नवे साडेतीन हजार रुग्ण, चिंता वाढली

लोकशाही न्यूज नेटवर्क

आतापर्यंत दोन ते अडीच हजार आढळणारा कोरोना रुग्णांचा आकडा आज जवळपसा साडेतीन हजारावर पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात दिवसभरात 3 हजार 451 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत 1 कोटी 51 लाख 8 हजार 645 नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 20 लाख 52 हजार 253 नमुने म्हणजेच 13.58 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 65 हजार 992 व्यक्ती होम क्वारंटाइन तर, 1 हजार 852 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. त्यानुसार अ‌ॅक्टिव्ह रुग्ण 35 हजार 633 आहेत.

राज्यात आज 2421 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 63 हजार 946 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.7 टक्के झाला आहे. आज दिवसभरात 30 रुग्णांचा मृत्यू नोंदवला गेला. त्यानुसार मृतांचा आकडा 51 हजार 390 वर पोहचला आहे. तर मृत्यूदर 2.50 टक्के आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ऊर्जा विभागातील भरती : एसईबीसीतील उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा लाभ घेण्याचा पर्याय

पॉर्न फिल्म रॅकेट : सूरतमधून एकाला अटक, आणखी नावे समोर येण्याची शक्यता