in

धक्कादायक ! मुंबईतील रेस्टॉरंटमधील १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

पुनःश्च हरी ओम म्हणतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील रेस्टॉरंट पब सुरू केले असतानाच, मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील १० कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. दररोज ७ ते ९ हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत असून, मुंबईतील दररोजची रुग्णासंख्याही १ हजार पेक्षा जास्तच आहे. सरकारकडून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात असतानाच मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील १० कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग कमालीचा वाढला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून, मुंबईतही कोरोनाचा प्रसार वाढला आहे. दरम्यान मुंबईतील प्रसिद्ध राधाकृष्ण रेस्टॉरंटमधील १० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या रेस्टॉरंटमध्ये ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या कर्मचाऱ्यांना बीकेसीतील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असून, इतरांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे रेस्टॉरंट दोन दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे. सॅनिटाइज केल्यानंतर आणि नवीन कर्मचारी आल्यानंतर पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मागील २४ तासांत मुंबईत करोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ११ हजार ४८७ झाला आहे. तर ६५४ बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नाशिकमध्ये पुन्हा एकदा तेलगीप्रमाणे स्टॅम्प घोटाळा – देवेंद्र फडणवीस

भारताचा चुकीचा नकाशा दाखविणाऱ्या अमेरिकन फ्रीडम हाऊसबद्दल तीव्र संताप