in

कोरोना चीनच्या वुहान लॅबमधून पसरला? WHOचा दावा

लोकशाही न्यूज नेटवर्क

जागतिक आरोग्य संघटना WHO ने कोरोनाचा उगम कुठून झाला हे तपासण्यासाठी वर्षभराने चीनला तपास पथक पाठविले होते. या पथकाचा तपास पूर्ण होत आला आहे. या पथकातील एका तज्ज्ञाने कोरोना चीनच्या वुहान लॅबमधून पसरला नसल्याचा दावा केला आहे. कोरोनाने कोणत्यातरी प्रजातीपासून मानवाच्या शरीरात प्रवेश केला असेल, असे त्यांनी मंगळवारी स्पष्ट करत वुहानच्या लॅबला क्लिन चिट दिली आहे.

कोरोनाची वेळेत माहिती दिली नाही, चीनच्या वुहान लॅबमधून कोरोना पसरविण्यात आल्याचे गंभीर आरोप अमेरिकेसह साऱ्या जगाने केले होते. यामुळे लॉकडाऊन काळात जगावर महायुद्धाचे ढग पसरू लागले होते. या साऱ्यात WHO च्या अध्यक्षांची भूमिका संशयास्पद होती. यामुळे WHO वरही संशय व्यक्त करण्यात येत होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी WHO चा निधी रोखला होता. तर चीनने आणखी तीन लाख कोटी डॉलर WHO ला दिले होते.

वुहान लॅबमधून कोरोना पसरल्याच्या साऱ्या चर्चांचे WHO ने खंडन केले आहे. डब्ल्यूएचओच्या तपासपथकातील अन्न सुरक्षा आणि जंतूरोग तज्ज्ञ पीटर बेन एम्बारेक यांनी सांगितले की, वुहानच्या लॅबमधून कोरोना पसरण्याची शक्यता नाहीय. तो एखाद्या जनावरातून पसरला आहे. वुहानच्या लॅबमधून पसरल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. यामुळे आम्ही आता वुहानच्या बाजारावर लक्ष केंद्रीत करणार आहोत.

WHO च्या पत्रकारपरिषदेत सिंघुआ विश्वविद्यालयाचे एक चिनी तज्ज्ञ लियांग वानियान यांनी सांगितले की, SARS-CoV-2 हा व्हायरस पाखे किंवा पँगोलिनमध्ये सापडतो. हेच कोरोना पसरविण्यासाठी कारणीभूत असतील. कारण कोरोना आणि त्या व्हायरसमध्ये खूप समानता आढळली आहे. मात्र, अद्याप या प्रजातींमध्ये कोणाशीही कोरोनाचा संबंध असल्याचे पुरावे सापडलेले नाहीत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चीनचा कांगावा….

CoronaVirus : राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 35 हजारापेक्षा कमी