in

अंबरनाथमध्ये परदेशात जाऊन आलेल्या मुलीला कोरोना

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रोन (Omicron) या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट पुन्हा एकदा देशाची चिंता वाढवली आहे. ओमायक्रोनचा संसर्ग इतर देशांमध्ये पसरताना दिसत आहे. कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक संसर्गजन्य असू शकतो असा दावा तज्ज्ञांचा आहे. कोरोना विषाणूचे नवीन ओमायक्रोन व्हेरिएंट जगासमोर एक नवीन समस्या बनली आहे. डब्ल्यूएचओने याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

कर्नाटकात दोघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं गुरुवारीच समोर आलं. महाराष्ट्रात अद्याप ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले नसले, तरी परदेशगमन करुन आलेल्या प्रवाशांबाबत सतर्कता बाळगली जात आहे. विशेषतः कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांबाबत प्रशासन हाय अलर्टवर आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात कुटुंबासह परदेशात जाऊन आलेली सात वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे.

संबंधित बालिका आई वडिलांसह रशियाला फिरण्यासाठी गेली होती. 28 नोव्हेंबरला हे कुटुंब रशियाहून अंबरनाथला परतलं. त्यानंतर काही दिवसात मुलीला त्रास होऊ लागल्यानं टेस्ट केली असता ती कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झाले. मुलीचे वडील निगेटिव्ह असून तिच्या आईच्या कोरोना चाचणीचे अहवाल येणं अद्याप बाकी आहे. विशेष म्हणजे मुलीची आई दोन दिवस ऑफिसलाही जाऊन आल्याचं उघड झालं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

omicron variant | ओमायक्रॉनसंबंधी विजय वडेट्टीवारांनी दिली ‘ही’ माहीती

भिवंडीत मित्राची मस्करी पडली महागात, गुदद्द्वारात मशीननं हवा भरल्याने एकाचा मृत्यू