in ,

पुण्यात एमपीएससीच्या आंदोलनावर नियंत्रण ठेवणारे पाच पोलीस कोरोनाबाधित

एमपीएससीची परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलल्याने पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर तसेच इतर ठिकाणी संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. पुण्यामध्ये रस्त्यावर उतरून विद्यार्थी आंदोलन करीत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यातील पाच पोलिसांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे.

एमपीएससीची परीक्षा रविवारी (14 मार्च) होणार होती. मात्र 11 मार्च रोजी परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर होताच. विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. पुण्यात या विद्यार्थ्यांनी तब्बल 8 तास लालबहादूर शास्त्री रस्ता रोखून धरला होता. यावेळी कोरोनाच्या नियमावलीचे सर्रास उल्लंघन झाले. कडक बंदोबस्त ठेवला होता. आंदोलन संपल्यानंतर काही कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांची चाचणी करण्यात आली. त्यातील पाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रियाज काझीला अटक होण्याची शक्यता

पेट्रोल-डिझेल GST च्या कार्यकक्षेत येणार की नाही ? निर्मला सीतारमण यांचं मोठं विधान