नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु शहरात सध्या ठिकठिकाणी गर्दी वाढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. नवी मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
फेब्रुवारी महिन्यातील 20 दिवसांमध्ये नुवी मुंबईत 2 हजार 110 रुग्ण वाढले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या आता 805 वरून 1040 वर पोहोचली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या देण्यात आलेली शिथिलता व करोना संसर्ग कमी होत गेल्याने नागरिकांमध्ये वाढलेली बेशिस्ती आणि त्यात एपीएमसी बाजारात नियमांची होणारी पायमल्ली यामुळे करोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे बोलले जात आहे.
Comments
Loading…