in

Corona Update| संगमनेर तालुक्यातील गावांमध्ये लॉकडाऊन

कोरोना विषाणूचा परिणाम संपूर्ण जगावर झाला. अशातच भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आणि आता कोरोनाची लाट ओसरत असतानाच आता कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णाची वाढ ही सातत्याने होताना दिसत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील वाढती कोरोना संख्या लक्षात घेता संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे,राजापूर व अन्य काही गावांमध्ये ७ दिवसासाठी अत्यावश्यक सेवा वगळता १००℅ बंद करण्यात आले आहे.

नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करावे असे आवाहन देखील यावेळी कोरोना दक्षता समिती कडून करण्यात आले आहे.संगमनेर तालुका पोलिस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.कोरोना नियमावलीचे सर्वांनी पालन करावे असे आव्हान संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, ठरले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर

Abhijit Bichukale | राष्ट्रपतीपदाचा उमेदवार अभिजीत बिचुकले पुण्यात विकतोय ‘कंदी पेढे’