in

महाराष्ट्राच्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत आज मोठी घट झालेली पाहिला मिळाली. राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल ३३ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९३.८८ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण १५ हजार ७७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात १८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण २ लाख ५३ हजार ३६७ आहे.

पुण्यात गेल्या महिन्यातली सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. गेल्या चोवीस तासात पुणे शहरात अवघे 180 रुग्ण आढळले, तर 751 जणांनी कोरोनावर मात केली. पुणे शहरात सध्या 6 हजार सक्रीय रुग्ण आहेत. रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासकडे आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात निर्बंध काहीप्रमाणात शिथील करण्यात आल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ममता बनर्जी आणि केंद्र पुन्हा आमने-सामने

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘वॉक इन’ पद्धतीने लसीकरण सुरु