in ,

corona vaccination |महानगरपालिकेचा घरोघरी लसीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला

मुंबई पालिकेने घरोघरी जाऊन वृद्ध, दिव्यांगांसाठी घरोघरी जाऊन कोरोना लसीकरणासाठी प्रस्ताव तयार केला होता. मात्र केंद्रीय आरोग्य विभागाने घरोघरी लसीकरणासाठी धोरण नसल्याचे सांगत हा प्रस्ताव नाकारला.

लसीकरण केंद्रांचा विस्तार काही प्रमाणात छोट्या-छोट्या लसीकरण केंद्रांपर्यंत लहान स्तरापर्यंत केला जाणार आहे. जेणेकरून लोकांना कोविडची लस घेण्यासाठी दोन किलोमीटरच्या पुढे प्रवास करावा लागणार नाही. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, मुंबईत जवळपास दीड लाखांहून अधिक वृद्ध, काही अंथरुणावर खिळलेले, काही दिव्यांग आहेत. ते लसीकरणासाठी घराबाहेर जाऊ शकत नाहीत. यासंदर्भात केंद्राला पत्र लिहिले होते. अशा नागरिकांना घरी जाऊन लस देण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, केंद्राने असे कोणतेही धोरण नसल्याचे सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol Diesel Price | होळीनंतर स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल दर

मोदींनी दिलेली माहिती ऐकून त्यांचे भक्त थरारून गेले असतील – शिवसेना