in

राज्यात 5 लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोना लस; तिसऱ्या टप्प्यासाठी केंद्राच्या सूचनेची प्रतीक्षा

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. ल652 केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत 5 लाखांहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण केले जाणार असून त्याची नोंदणी 1 मार्चपासून होऊ शकते, अशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्यात केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे लसीकरण सुरू आहे. प्रत्येक आठवड्याला लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात दररोज साधारणपणे 40 ते 45 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे.

आतापर्यंत को-विन पोर्टलवर 10 लाख 54 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी 4 लाख 68 हजार 293 आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. 5 लाख 47 हजार फ्रंटलाईन वर्कर्सची नोंदणी झाली असून त्यापैकी 41 हजार 453 जणांना लस देण्यात आली आहे. राज्यात लसीकरणादरम्यान कुठेही गंभीर दुष्परिणामाच्या घटनांची नोंद झाली नाही.

तिसरा टप्पा 1 मार्चपासून?
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील व ज्यांना सहव्याधी आहे अशा 50 वर्षाखालील व्यक्तींना लसीकरण करणार असून त्यासंदर्भात केंद्र शासनकडून सूचना मिळाल्या नाहीत. साधारणपणे 1 मार्चच्या सुमारास त्यांची नोंदणी सुरू होण्याची शक्यता असून त्यानंतर लसीकरण केले जाईल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

श्रीराम फक्त तुमचे नाहीत… फारुख अब्दुल्लांनी सुनावलं

Corona Vaccine | तिसऱ्या टप्प्यात ‘या’ व्यक्तींना मिळणार लस