in ,

शरद पवारांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोरोना प्रतिबंधक लस घेतली. मुंबईच्या जे जे रुग्णालयात त्यांनी ही लस टोचून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नीसह त्यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळेसुद्धा उपस्थित आहेत.

आजपासून देशात करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून त्याअंतर्गत ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. आज सकाळीच सात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिल्लीमध्ये कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला. त्यामुळे शरद पवार हे सुद्धा लस घेण्यासाठी जे जे रुग्णालयात पोहचले.रुग्णालयात डॉक्टरांकडून त्यांची सर्वप्रथम सर्व वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर आज शरद पवार यांना लस टोचण्यात आली. आज दुपारी तीनच्या सुमारास पवारांनी रुग्णालयामध्ये येऊन लस घेतली.

आजपासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ही लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करतो,” असं पवार यांनी लस घेतानाचा व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे यांनीही घेतली कोरोना लस

शरद पवार यांच्यासोबत जे. जे. रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास गेलेल्या सुप्रिया सुळे यांनीही कोरोना लस घेतली आहे. रुग्णालयाच्या कर्मचारी श्रद्धा मोरे यांनी ही लस दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold Price Today : सोनं झालं स्वस्त

आत्महत्येपूर्वी हसत-हसत तिनं बनवला व्हिडिओ; नेटीजन्स करतायत न्यायाची मागणी