in

आता मिळणार 12 वर्षाखालील मुलांसाठी कोरोना लस

कोरोनाच्या संसर्गाचे थैमान संपूर्ण जगभरात सुरू असताना आता एक दिलासा देणारी बातमी समोर येतीय. अमेरिकन लस उत्पादक कंपनी फायजरने 12 वर्षाखालील मुलांसाठी कोरोना लस तयार केलीय. या लशीची मानवी चाचणीही सुरू झाली आहे. परंतु सध्या 16 वर्षाखालील मुलांना लस देण्यात येत नाही. या वयोगटातला लस देण्याबाबत जगभरात चर्चा सुरू होत्या. अशातच फायजरने लहान मुलांसाठीच्या लसीची चाचणी सुरू केल्याने याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागलंय.

कोरोना व्हायरस संक्रमण नियंत्रणात ठेवण्यासाठी जगभरात कोरोना लसीकरण सुरु आहे. सर्व प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांचं कोरोना लसीकरण केलं जातंय. मात्र, लहान मुलांना कोरोना लस द्यावी की नाही याबाबत अद्यापही संभ्रम कायमय होता मात्र, आता हा संभ्रम लवकरच दूर होणार आहे.

फायजर कंपनीकडून खास लहान मुलांसाठी आता कोरोना लस निर्मीती केली जाणार आहे. फायजर कंपनीकडून त्याबाबत चाचणीही सुरु करण्यात आल्याचं समजतंय. फायजर या अमेरिकन औषध कंपनीने 12 वर्षांखालील मुलांचं कोरोना लसीकरण करण्यसाठी एका विशिष्ठ प्रकारच्या लसीची निर्मीती केली आहे.

सध्याच्या स्थितीत 16 वर्षे पूर्ण असलेल्या कोणत्याही व्यक्तीला कोरोना लस घेता येते. फायझरनं लहान मुलांसाठी बनवलेल्या लसीचा पहिला डोस स्वयंसेवकांना नुकताच देण्यात आलाय. लहान मुलांसाठी निर्माण केलेल्या लस चाचणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आतापर्यंत 144 मुले सहभागी झालीयत. पुढच्या टप्प्यात 4,500 मुलांना लस देण्याचं कंपनीचं नियोजन आहे. लहान मुलांसाठी विकसित केलेली लस ही एकूण तीन डोसमध्ये देण्यात येईल. सध्यास्थितीत या लसीचे दोन डोस दिले जात आहेत.

कोरोना चाचणीसाठी सहभागी होणाऱ्या मुलांवर होणारा परिणाम, रोगप्रतिकारकशक्ती, मुलांची लस सहन करण्याची क्षमता अशा गोष्टी तपासण्यात येतायत. या लसीचे टप्पे येत्या सहा महिन्यांमध्ये पूर्ण होतील. त्यानंतर ही लस बाजारात येऊ शकेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केलाय.

या लसीच्या सर्व क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्या आणि त्याचे काही दुष्परिणाम दिसून आले नाहीत तर जगभरात या लसीचा वापर होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाशी लढणाऱ्या सगळ्या जगासाठी ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फोन टॅपिंग प्रकरण : …यामागील फडणवीसांचा हेतू मला कळत नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका

वचन देतो, येत्या 5 वर्षात भारतातील संपूर्ण पायाभूत सुविधा बदलतील – नितीन गडकरी