in

Corona Vaccine | आता खासगी रुग्णालयातही मिळणार कोरोनाची लस!

भारतात सीरम इन्स्टिट्युटची Covishield आणि भारत बायोटेकची Covaxin या दोन कोरोना लशींना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यानंतर देशभरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी १६ जानेवारी २०२१पासून लसीकरणाच्या मोठ्या मोहीमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स लस दिली जात आहे. काही दिवसानंतर तिसऱ्या टप्प्यात लसीकरणाच्या मोहीम सुरुवात होणार आहे.

या पार्श्वभूमीवर आता खासगी रुग्णालयांमध्ये देखील कोरोनाची लस मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याची माहिती दिली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोग्य सेवा पुरवणाऱ्या खासगी ठिकाणी (रुग्णालय, क्लिनिक, दवाखाने) करोनाची लस लवकरच मिळू शकणार आहे. मात्र, खासगी ठिकाणी ही लस खरेदी करावी लागणार आहे. त्यासाठीची कमाल किंमत देखील सरकारकडून निश्चित करण्यात येईल. सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी लस मात्र पूर्णपणे मोफत असेल. तिचा खर्च हा पूर्णपणे सरकारकडून उचलला जाईल.”

किती असेल लशीची किंमत?

दरम्यान, खासगी ठिकाणी दिल्या जाणाऱ्या लशीसाठी २५० रुपये किंमत निश्चित झाल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिलं आहे. या किंमतीमध्ये १०० रुपये सेवा शुल्क देखील समाविष्ट असेल. यासंदर्भात केंद्र सरकारकडून किंवा आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप घोषणा करण्यात आलेली नसली, तरी ती लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील यासंदर्भात काही दिवसांपूर्वी संकेत दिले होते. यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाईल, असं देखील त्यांनी सूचित केलं होतं

देशात आत्तापर्यंत झालेलं लसीकरण…

दरम्यान, राजेष भूषण यांनी आजपर्यंत देशात झालेल्या लशीकरणाविषयी देखील यावेळी माहिती दिली. आत्तापर्यंत देशातल्या ७७ टक्के अर्थात ६६ लाख ३७ हजार ०४९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लशीचा पहिला डोस देण्यात आला असून ७० टक्के अर्थात २२ लाख ४ हजार ०८३ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देऊन झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sindhudurg | हजारो कोटी रूपयांचा सिलिकॉन सँण्डचा घोटाळा; विशेष IAS अधिकारी नेमून चौकशी करण्याची मागणी

‘लोकशाही न्यूज’ची सामाजिक बांधिलकी; शेकडो कुटूंबांना मदतीचा हात