in ,

”चीनच्या वुहान लॅबमधूनच पसरला कोरोना विषाणू”, अमेरिकेचा दावा

कोरोना वैश्विक महामारीने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. पहिली लाट त्यानंतर आलेल्या दुसऱ्या लाटेने मृत्यू तांडव सुरुच आहे. दरम्यान हा नेमका विषाणू कुठून आला असा प्रश्न अनेक देशांना पडला आहे. याचे उत्तर आता अमेरिकेने शोधले आहे. जगाला संशय असलेल्या चीनच्या वुहानमधील त्याच प्रयोगशाळेत कोरोना विषाणू बनविला गेला होता, अमेरिकन प्रयोगशाळेच्या अहवालानेही यावर शिक्कामोर्तब केले आहे.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना विषाणूने जगभरात विनाश केला आहे. यामध्ये कोट्यावधी नागरिकांना संसर्ग झाला आहे तर लाखोंनी आपले जीव गमावले आहेत. मात्र या सर्वात कोरोना विषाणूची उत्पत्ति कशी झाली? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. यावर अनेक देशांचे संशोधन सुरूच आहे.

अमेरिका सरकार कोरोना विषाणूवर संशोधन करीत आहे. चीनमधील वुहान लॅबमधून कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याची शक्यता असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार हा अभ्यास कॅलिफोर्नियामधील लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीने मे २०२० मध्ये सुरू केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी राज्य विभागाने व्हायरसच्या मूळ स्रोताच्या तपासणीचे आदेश दिले होते. लॉरेन्स लिव्हरमोरचे मूल्यांकन कोविड-१९ विषाणूच्या जीनोमिक विश्लेषणावर आधारित आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमरावती आढळलं अज्ञात प्रेत.. हत्या की आत्महत्या

“ग्लोबल टेंडर असफल होण्यामागे मोदी सरकारचा दबाव”