in

Corona virus | देशात दैनंदिन रुग्णसंख्येत घट; 24 तासांत 437 मृत्यू

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव घटल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच दैनंदिन रुग्णसंख्येतही कमालीची घट झाली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव घटला असला तरी, धोका मात्र अद्याप टळलेला नाही. देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 283 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 437 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात एक लाख 11 हजार 481 सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत देशात 4 लाख 66 हजार 584 रुग्णांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात 10 हजार 949 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच या व्हायरसमुळे जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या 4 लाख 66 हजार 584 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 45 लाख 35 हजार 736 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पहिली ते चौथी शाळा सूरू करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

सलामान खान, आयुष शर्मा ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी पुण्याला रवाना