in

Corona Virus Updates | देशात वाढतोय कोरोना , नवी आकडेवारी चिंता वाढवणारी

संपूर्ण देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येचा विस्फोट होत आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत असल्यानं राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. पण आता इतर राज्यांमध्येही काही वेगळी परिस्थिती नाही. महाराष्ट्रानंतर आता इतर राज्यांमध्येही कोरोना भयंकर रुप धारण करत असल्याचं नव्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. “राज्यात १२ ते १३ दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, पण परप्रांतीय कामगारांनी गावी जाऊ नये”, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

देशात सोमवारी १ कोटी ६० लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता १२ लाखांच्या वर पोहोचली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत जात आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनऊवर लॉकडाऊनची टांगती तलवार आहे. एकट्या लखनऊमध्ये दिवसागणिक ४ हजार रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेवरही ताण वाढत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड्स अपुरे पडत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

दुसरीकडे उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत तब्बल १८ हजार २१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. एका दिवसातील रुग्ण वाढीचा उत्तर प्रदेशचा हा सर्वाधिक आकडा नोंदवला गेला आहे. तसंच गेल्या २४ तासांत राज्यात ८५ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये नाइट कर्फ्यू देखील लावण्यात आला आहे.

देशाची राजधानी दिल्लीतही कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसतंय. दिल्लीत सोमवारी ११ हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळलेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिल्लीतही नाइट कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. यासोबत इतरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या ३८ हजारापेक्षा जास्त झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता पडत आहे. यामुळेच दिल्ली सरकारनं १४ खासगी रुग्णालयांना पूर्णत: कोविड रुग्णांसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील कोरोनाची परिस्थिती
एकूण रुग्ण: 1,36,89,453
देशात सध्या सक्रिय रुग्ण: 12,64,698
आतापर्यंत झालेले मृत्यू: 1,71,058

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CM Uddhav Thackeray : हीच ती वेळ … मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात जनतेशी साधणार संवाद

Facebook | मार्क झुकेरबर्गच्या सुरक्षेवर दिवसाला तब्बल एवढे रुपये खर्च होतात