in

Corona Virus : रुग्णांचा आकडा अद्याप 35 हजारपेक्षा जास्तच, मृतांचा आकडाही वाढला

राज्यात नवीन कोरोना रुग्णांची संख्या अजूनही 35 हजारच्या पुढेच आहे. मात्र आज मृतांची संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. आज तब्बल 166 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. गेले दोन दिवस 111 आणि 112 असणारा हा आकडा वाढल्याने राज्य सरकारसह आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.

राज्यात आज 35 हजार 726 नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत 1 कोटी 91 लाख 92 हजार 750 चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी 26 लाख 73 हजार 461 चाचण्यांचे अहवाल (13.93 टक्के) पॉझिटिव्ह आला आहे. सध्या राज्यात 3 लाख 3 हजार 475 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 14 लाख 88 हजार 701 रुग्ण होम क्वारंटाइन आणि 15 हजार 644 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइन असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांमध्ये 14 हजार 523 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, कोरोनावर मात केलेल्यांचा एकूण आकडा 23 लाख 14 हजार 579वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याच दर 86.58 टक्के झाला आहे. राज्यात आज 166 जणांचा मृत्यू झाला असून, राज्यातील मृत्यू दर 2.02 टक्के एवढा आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फोन टॅपिंग प्रकरण : फडणवीस सांगतात, मी तर दोनच पाने दिली, पण बाकीची…

‘बांगलादेशच्या निर्मितीत इंदिराजींचीच भूमिका महत्वाची, ‘त्यांनी’ इकडे नाही तर, तिकडे मान्य केले…’