in

लस घेतल्यानंतर अमरावतीत 19 जणामंध्ये कोरोनाची लक्षणे, माजी कृषीमंत्र्यांचाही समावेश

लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोना प्रतिबंधक लस घेतली असल्याने कोरोना होणार नाही, असे अनेकांना वाटते. पण अमरावतीत अशाच लस घेतलेल्या 19 जणांना कोरोना झाला आहे. 10 दिवसांपूर्वीच माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यांना देखील कोरोना झाला आहे.

महाराष्ट्रासह देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 874 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यातल्या 214 कर्मचाऱ्यांनी लस घेतल्यानंतर त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.कोरोनाबाधितांती संख्या एकीकडे कमी होत चालली असताना दुसरीकडे देशात सर्वत्र लसीकरणाची मोहीमही राबविण्यात येत आहं. त्यामुळे काही जणांनी मास्क वापरण्यास टाळाटाळ सुरू केली आहे, तर काही जणांनी सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशनच्या नियमांना हरताळ फासला आहे. मात्र आमरावतीची स्थिती ध्यानी घेता लसीबरोबरच कोरोनाचे नियम पाळण्याची गरज आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Parliament Session PM Modi LIVE : घोषणाबाजी नंतर राहुल गांधीसह कॉंग्रेसच्या सदस्याचा सभात्याग

‘क्रोनीजीवी’…देश विकायला निघालाय!