in ,

Corona Virus : वाढता वाढता वाढे कोरोना रुग्णांची संख्या!


महाराष्ट्रात नव्या कोरोना रुग्णसंख्येचा मोठा उद्रेक झाला आहे. आज जवळपास रेकॉर्ड ब्रेक असे 8 हजार 807 असे नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्या तुलनेत निम्मे आज डिस्चार्ज झाले आहेत. त्यामुळे राज्यसरकारची व आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. तसेच राज्य लॉकडाऊनच्या दिशेने वळतेय की काय अशी भीती आता सतावू लागली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना लॉकडाऊन करण्यासंदर्भात नागिरकांना 8 दिवसांचे अल्टीमेटम दिले होते. मात्र तरीसुद्धा रुग्णवाढीचा आलेख दररोज उंचावत चालला आहे. आजची रुग्णवाढ पाहता मध्यंतरी नियमात शिथिलता दिल्यानंतर आता आकडेवारी आभाळ गाठ्तेय.

आज राज्यात 8 हजार 807 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या 21लाख 21 हजार 119 वर पोहोचली आहे. तर आज नवीन 2772 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यत एकूण 20 लाख 08623 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 59358 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70% झाले आहे.राज्यात आज 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 51हजार 937 वर पोहोचली आहे.

दरम्यान सोमवारी 5 हजार 210 आणि मंगळवारी 6 हजार 218 रुग्ण सापडले होते. मात्र आज तर कोरोना आकडेवारीने मोठा उच्चांकच गाठला. थेट 8 हजार 807 कोरोना रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे राज्याची चिंता वाढवणारी बाब असून लॉकडाऊनचं संकट आता घोघावतेय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रत्नागिरीचा आंबा पोहोचला लंडनला, पेटीला मिळला 5 हजार भाव

Lokshahi Impact; भात गिरणी मालकाला आलेल्या ८० कोटीच्या बिलाची महावितरणाकडून दुरुस्ती