in , ,

कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत मिळणार; काय आहेत नियम आणि अटी?

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पन्नास हजारांची मदत जाहीर केली आहे. या संदर्भातील जीआर राज्य सरकारनं जारी केला आहे.केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मदत करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

कोणाला मिळणार मदत?

  • कोरोनामुळे निधन पावलेल्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकास 50,000 रुपये मदत देण्यात येणार
  • कोरोनाचे निदान झाल्यापासून 30 दिवसाच्या आत मृत्यू झाला असल्यास पात्र ठरणार
  • कोरोनामुळे रुग्णालयाच्या बाहेर मृत्यू अथवा आत्महत्या केली असल्यास मदत देणार
  • कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात 30 दिवसानंतर झाला असला तरी मदत देणार
  • रुग्णालय किंवा घरामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचा Form 4 व 4 A मध्ये नोंदणी झाली असल्यास पात्र ठरणार
  • “कोव्हिड- 19 मुळे मृत्यू” अशी नोंद नसली तरीही अटीची पूर्तता होत असल्यास मदत मिळणार
  • नातेवाईकांना राज्य सरकारच्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक
  • अर्जदाराने स्वतःचा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक, अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, इतर नातेवाईकाचे नाहरकत स्वयं घोषणापत्र देणे आवश्यक
  • मृत व्यक्तीच्या RT-PCR/ Molecular Tests/RAT Positive अहवाल अर्जदाराला संगणकीय प्रणालीवर अपलोड करावा लागेल

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मराठवाड्यात मेट्रो सुरू करण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू – नितीन गडकरी

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्वाची बातमी!