संपूर्ण देशात महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट अधिक आक्रमक असल्याचे सांगितले जात आहे. तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग ३०० टक्के अधिक तीव्र असल्याचा दावा केला जात आहे. गतवर्षी म्हणजेच सन २०२० मधील मार्च महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर जुलै महिन्यात दररोज ६० हजार रुग्ण आढळून येत होते.
गेल्या ३० दिवसांत तीन लाख कोरोना रुग्ण
गतवर्षीच्या जुलैप्रमाणेच आताच्या घडीला प्रतिदिन रुग्ण संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. गेल्या ३० दिवसांत तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णसंख्या अधिक वाढत राहिली, तर यावर नियंत्रण मिळवणे कठीण होईल, अशी भीती शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही २०० टक्के वाढ नोंदवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
Comments
Loading…