लोकशाही न्यूज नेटवर्क | मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. नियमांच योग्यरित्या पालन झालं नाही तर, कठोर करवाई करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
ऑनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. यात मुंबई लोकलपासून शाळा, महाविद्यालयांना देखील आता परवानगी देण्यात आली आहे. मात्र या वाढत्या गर्दीमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये देखील भर पडत आहे आणि याच पार्श्वभूमीवर सोमावारी औरंगाबाद येथे बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नियमांचं काठेकोरपणे पालन करण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. यासह, कामचुकारपणा केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला आहे. ट्रेकिंग करणे, ट्रेसिंग, उपचार आणि संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी वाढवण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत; मात्र हे काम करताना निष्काळजीपण, कामचुकारपणा केल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करू, असं त्यांनी सांगितलं.
सरकारकडून जी नियमावली जारी करण्यात आली आहे, त्याचं पालन योग्य प्रकारे होत नाही, मुंबई लोकल सुरु करण्यात आली आहे, यासह सर्व ठिकाणी नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र यात जनता शिस्तीचं पालन करत नाही, त्यामुळे त्यांनी या नियमांचं पालन करावं. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली होती, मात्र मागील काही दिवसांत रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ज्याप्रमाणे पाश्चिमात्य देशात नागरिकांना पुन्हा लॉकडाऊनला सामोरं जाव लागत आहे, तसंच आपल्याकडे देखील जावं लागेल, पण ते होऊ नये यांची काळजी घ्या, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.
लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू
सोमवारपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. दुसरा डोस देण्यात येतोय, कोविन अँपमध्ये कुठलाही दोष नाही. ज्यांनी मॅन्युअल पद्धतीने आपली माहिती दिली आहे. त्यांना त्याच पद्धतीने पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे, असा खुलासा ही त्यांनी केला आहे.
Comments
Loading…