in

coronavirus updates: कोरोनाच्या मृत्युसंख्येत मोठी घट!

राज्यात कालच्या तुलनेत आज कोरोना बाधितांच्यादैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. शिवाय मृत्यूची संख्याही कमी झाली आहे. तसेच कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटल्याने राज्यातील करोना संसर्गाची आजची स्थिती तुलनेने दिलासादायक आहे. तर दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत किंचित घट झालेली असली तरी राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्येत घट झाली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात २ हजार ५८३ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार ४१३ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार ८३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ८ हजार ३२६ इतकी होती. तर, आज २८ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ४९ इतकी होती.

आज राज्यात झालेल्या २८ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ४० हजार ७२३ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१८ टक्के इतके झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

डोक्यावरचं छप्पर गेलेल्यांना ‘नाम’ फाऊंडेशनचा मदतीचा हात

‘हा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग नाही तर काय?’; शिवसेनेचा सवाल