in

अ‍ॅण्टीबॉडीज निर्माण करण्यात ‘कोव्हिशिल्ड’ ‘कोव्हॅक्सिन’पेक्षा सरस

Healthcare cure concept with a hand in blue medical gloves holding Coronavirus, Covid 19 virus, vaccine vial

‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे शरीरामध्ये अधिक प्रमाणात अ‍ॅण्डीबॉडीज (प्रतिपिंडे) निर्माण होतात. करोना व्हॅक्सिन इंडक्टेड अ‍ॅण्टीबॉडीज टीट्री (म्हणजेच कोव्हॅट) अंतर्गत करण्यात आलेल्या अभ्यासाहून ही माहिती समोर आली आहे. या अभ्यासामध्ये दोन्हींपैकी कोणत्याही लसीचे दोन डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.

कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींच्या शरीरामध्ये सेरोपोझिटिव्हिटी अ‍ॅण्टी-स्पाइक अ‍ॅण्टीबॉडीज तयार होण्याचं प्रमाण हे कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांपेक्षा अधिक होतं, असं या अभ्यासामध्ये नमूद करण्यात आल्याचं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. हा अहवाल प्रकाशित झालेला नसून त्यावरील काम सुरु असल्याने सध्या त्याचा वापार क्लिनिकल प्रॅक्टीससाठी करता येणार नाहीय. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही लसींचे दोन डोस घेतल्यानंतर मोठ्या संख्येने अ‍ॅण्टीबॉडीज निर्माण होत आहेत. मात्र सेरोपोझिटिव्हिटी आणि अ‍ॅण्टी-स्पाइक अ‍ॅण्टीबॉडीज तयार होण्याचं प्रमाण हे कोव्हिशिल्ड घेतलेल्यांमध्ये अधिक असल्याचं दिसून आलं आहे. सेरोपोझिटिव्हिटी म्हणजेच अ‍ॅण्टीबॉडीज शरीरामध्ये असतानाच विषाणूला प्रतिसाद देण्याची क्षमता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Petrol Diesel Price | महाराष्ट्रात पेट्रोल शंभरी पार, नवे दर काय?