in

महिला अत्याचार : मस्कारा आणि आयलायनर ठरणार पुरावे…

महिलांसंबधी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आता पंजाब विद्यापीठातील एका प्राध्यापकाने संशोधन केले आहे. प्राध्यापक विशाल शर्मा यांनी एक वर्ष संशोधन करून स्पेक्ट्रोस्कोपीच्या मार्फत शोध लावला आहे. महिलांच्या दैनंदिन वापरातील आयलायनर आणि मस्कारा यांचा उपयोग महिलेविरोधात झालेल्या गुन्ह्यांत पुरावा म्हणून होऊ शकतो.

मायक्रो केमिकल जर्नल – इल्सेव्हिअर यामध्ये हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे. याचा सक्सेस रेट ९५ टक्के असल्याची माहिती प्राध्यापक विशाल शर्मा यांनी दिली आहे

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा शोध लावण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. स्पेक्ट्रोस्कोपीच्या वापराने कॉस्मिक घटकांचे ठसे मिळवणे आता शक्य झाले आहे. यामुळे तपासाला गती मिळणार असून त्यातील क्लिष्ट प्रक्रिया टळू शकते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंबानींच्या घराजवळील संशयास्पद गाडी विक्रोळीतून चोरली; मुंबई पोलिसांच्या हाती CCTV फुटेज

Sensex Fall | शेअर बाजारात एक हजार अंकांची घसरण