in ,

Election Result 2021 | 5 विधानसभांसाठी आज मतमोजणी, प. बंगाल, केरळ, तामिळनाडूमध्ये कोण मारणार बाजी?

कोरोना महामारीमध्ये ४ राज्ये आण‍ि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभांसाठी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी आज रविवार, २ मे रोजी होणार असून, मतदारांनी कोणाला कौल दिला, हे उघड होणार आहे. मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार असून, त्या दरम्यान कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आण‍ि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. आसाममध्ये तीन तर पश्च‍िम बंगालमध्ये सर्वाधिक ८ टप्प्यांमध्ये मतदान झाले. महाराष्ट्रात पंढरपूर विधानसभा मतदारसंघासह देशभरात एकूण ४ लोकसभा व १३ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही रविवारी होणार आहे.

मतमोजणी केंद्रांवर कठोर निर्बंध
मद्रास उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी निर्बंध लावले आहेत. उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रांवर प्रवेशासाठी आरटी-पीसीआर किंवा रॅपिड अँटिजन चाचणी निगेटिव्ह बंधनकारक केली आहे. तसेच निवडणूक आयोगाने निकालानंतर विजयी मिरवणुकांवर बंदी घातली आहे. याशिवाय विजयाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी उमेदवाराने दोनपेक्षा अधिक व्यक्ती सोबत नेऊ नयेत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

बहुमताचा आकडा
राज्य – जागा – बहुमत
प. बंगाल – २९४ – १४८
तामिळनाडू – २३४ – ११८
केरळ – १४० – ७१
आसाम – १२६ – ६४
पुदुच्चेरी – ३० – १७
(प. बंगालमध्ये २९२
जागांवर झाले मतदान)

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

WB Election 2021 | पश्चिम बंगाल निवडणुकीचा निकाल; टीएमसी की भाजप मारणार बाजी

Pandharpur Election Result 2021 | पंढरपूरच्या विजयाचा गुलाल कुणाचा? थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात