in

‘कोर्ट’ चित्रपटातील अभिनेते वीरा साथीदार यांचं कोरोनामुळे निधन

नागपुरातील विचारवंत, लेखक आणि अभिनेते वीरा साथीदार यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कोर्ट सिनेमातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. कोरोनावरील उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. ८ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. नागपुरातील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पत्रकार, लेखक, विचारवंत म्हणून परिचीत असलेले वीरा साथीदार कोर्ट चित्रपटातील भूमिकेमुळे चांगलेच गाजले. मूळ वर्धा जिल्ह्यातील असलेले वीरा हे नागपूरच्या जोगीनगर झोपडपट्टीत लहानाचे मोठे झाले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना आईनं त्यांना शिकण्याचं बळ दिलं. त्यांचे वडील नागपूरच्या रेल्वे स्थानकावर हमाली, तर आई बांधकाम मजूर म्हणून काम करत असे.

वीरा यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जबरदस्त पगडा होता. ते स्वत: गीतकार, पत्रकार होते. गावोगावी जाऊन त्यांनी आंबेडकरी चळवळतील अनेक गाणी गायली. ‘विद्रोही’ मासिकाचे संपादनही केलं. ‘रिपब्लिकन पँथर’ संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते.

‘कोर्ट’ चित्रपटामुळे प्रसिद्धी –

चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला ‘सुवर्णकमळा’चा सर्वोच्च बहुमान मिळाला होता. न्यायव्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाचं देशविदेशातील अनेक महोत्सवात कौतुक झालं होतं. या चित्रपटात वीरा साथीदार यांनी नारायण कांबळेंची भूमिका साकारली होती. यानंतर कोर्ट चित्रपटानं ऑस्करचा पल्ला गाठला होता. ऑस्करच्या बेस्ट फॉरेन फिल्म विभागासाठी कोर्ट चित्रपटाची निवड झाली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण | NIAने तपासले 800 सीसीटीव्ही फुटेज

मुख्यमंत्री लॉकडाउनबाबत आजच मोठा निर्णय घेतील – अस्लम शेख