in

लसीकरणासाठी आधार सक्तीबाबत यूआयडीएआयकडून दिलासा!

आधार कार्ड नसलेल्यांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यास नकार देता येणार नसल्याचे निर्देश देत भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) ने नागरिकांना दिलासा दिला आहे.लस देणे, उपचार करणे किंवा रुग्णालयात भरती करण्यासाठी आधार कार्ड नसलेल्यांना नकार देणे योग्य नाही. फक्त आधार कार्डचे कारण सांगून असे करता येणार नसल्याचेही सांगितले आहे.

अनेक ठिकाणी आधार कार्ड नसेल तर उपचार करणे, हॉस्पिटलमध्ये भरती करणे व लसीकरण करण्यास नकार दिला जात आहे.देशात सध्या ज्यांच्याकडे आधार कार्ड असेल त्यांनाच लसीकरण केले जात आहे. आधार कार्ड नसेल तर लसीकरण, आरोग्य सुविधा नाकारल्याने त्याबाबत तक्रारी होत्या. या तक्रारींनंतर हा निर्णय घेतला आहे.
लसीकरणावेळी आधार कार्ड क्रमांक नोंदवून घेतला जातो. मोबाइल क्रमांक नोंदवला जातो. मात्र, ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढले नाही त्यांच्या लसीकरणाविषयी संभ्रम होता, आता मात्र आधार कार्डमुळे होणारी अडवणूक थांबणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोकण रेल्वेट्रॅकवर झाड कोसळले, वाहतूक ठप्प

अमरावतीच्या युवकाचा अटकेपार झेंडा; स्कॉटलँड संसदेत घेतली खासदारकीची शपथ