in

‘कोविड योद्ध्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

गेल्या वर्षांपासून कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अविरत रुग्ण सेवा देणाऱ्या १५० कर्मचाऱ्यांचे वेतन ४ महिन्यांपासून थकीत आहे. त्यांनी उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे कोविड योद्ध्यांनी धरणे आंदोलन पुकारले आहे.

१ ऑगस्टपासून कोविड काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. अशा परिस्थितीत कोवीड योद्ध्यांना हक्काचे पैसे तत्काळ देण्यात यावे व सेवेत पुन्हा सामावून घेण्याची मागणी त्यांची आहे. तसेच देश कोरोनामुक्त होईपर्यंत यांना नियमित सेवेत रुजू करण्यात यावे,

कोरोना रुग्ण सेवकांना विमा संरक्षण देण्यात यावे, तसेच भविष्यात जेव्हा स्थायी अटेंडन्ट व सफाईगार या पदांची भरती करण्यात येईल तेव्हा कोरोना रुग्ण सेवकांना प्राधान्य देण्यात यावे या मागण्याला घेऊन भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालया सामोर धरणे आंदोलन सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…तर महापालिकेतच भाजप पक्षप्रवेश कार्यक्रम राबवेल; आमदार गणेश नाईकांचा इशारा

भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी भरले खड्डे; डोंबिवलीतील प्रकार