in

CoWIN Down| नोंदणी सुरु होताच अॅपचे सर्व्हर डाऊन , 3 तासात ८० लाख लोकांनी केली नोंदणी

कोरोना लसीकरणासाठी १ मे पासून प्रारंभ होणार आहे. या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांना सरसकट लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी cowin.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. मात्र या साईटवर नोंदणी सुरु झाल्यानंतर पहिल्या काही मिनिटांमध्येच सर्व्हर डाऊन झाल्याचे दिसून आले. अनेकांनी सोशल मीडियात स्क्रीनशॉट व्हायरल करत नोंदणी होत नसल्याची तक्रार केली. आरोग्य सेतूमधूनही नोंदणी करतानाही cowin. gov. in वर रिडायरेक्ट करत असल्याने वेबसाईटवर ट्रफिक वाढून हँग झाल्याची माहिती समोर येत आहे. तासात ८० लाख लोकांनी केली नोंदणी केल्याची माहिती समोर येत आहे.

अशी करा नोंदणी

लस घेणार्यां ना www.cowin.gov.in या साईटवर नोंदणी करावी लागणार आहे. Google वर जाऊन cowin.gov.in टाईप करा. Register/ Sign in yourself मध्ये लस घेणार्यांgचा मोबाईल नंबर टाईप करा. यानंतर OTP जनरेटवर क्लिक करा. नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल. तो OTP मध्ये टाका व क्लिक करा. यानंतर Vaccine Registraction form भरा. क्लिक करा. vaccine साठीregistraction केल्यानंतर मोबाईलवर मेसेज येईल. त्यांनतर नोंदणी झाल्यानंतर schedule appointment वर क्लिक करा.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग्ज समोर 172 धावांचे आव्हान

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत लसीची रक्कम दान करा; सत्यजित तांबेंचे आवाहन