in ,

BIGGBOSS | बिगबॉस फेम हभप शिवलीला पाटील यांच्या कीर्तन आयोजकांवर गुन्हा

संदीप शुक्ला बुलडाणा | जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने शिवलीला पाटील यांचा कीर्तन आयोजका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवलीला पाटील या बिग बॉस मराठी सिझन ३ च्या माजी स्पर्धक आहेत. त्या बुलडाण्यात कीर्तनासाठी आल्या होत्या आणि त्यावेळी तेथे प्रचंड गर्दी झाली होती.

दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांन विरोधात याप्रकरणी बुलडाणा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान पाटील यांच्या कीर्तनास जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने विरोध दर्शवला होता .पण, आयोजकांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत कीर्तनाचे आयोजन केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी जमवू नये. असे आदेश बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी दिले होते. देऊळगाव मही येथील राजमाता जिजाऊ दुर्गा मंडळ यांच्या वतीने पाटील यांचे कीर्तन आयोजित केले होते. कीर्तनास २०० हून अधिक लोक उपस्थित होते. याबाबत पोलिस उपनिरीक्षक किरण खाडे यांनी सरकारतर्फे पोलिसात मंडळाचे आयोजक संदीप राऊत, गणेश साहेबराव गोरे व किशोर पोफळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Tuljabhavani temple | वशिलेबाजी व सो कॉल्ड व्हीआयपींना लगाम; मंदीर संस्थानकडून नियमावली जाहीर

सामाजिक बांधिलकी जपणारा जय हिंद दुर्गोत्सव मंडळाचा अनोखा नवरात्रोत्सव