in

‘केंद्रात मंत्रिपद दिल्यानंतर सांगितलं फिरा’; अजित पवारांची आपल्या खास शैलीत टीका

अमोल धर्माधिकारी | राज्यात भाजपची जनआशीर्वाद सूरू आहे, या य़ात्रेत नाराय़ण राणेंच्या य़ात्रेणे राज्यात वादंग माजला होता. या सर्व घडामोडीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. या चौघांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर सांगितलं फिरा. आता मंत्रिपद मिळाल्यानंतर फिरणं भाग आहे. प्रत्येकाने जर भान ठेवून वक्तव्य केलं असतं तर हे प्रसंग आले नसते.”, असं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना अजित पवार म्हणाले. कोरोना संदर्भात पुण्यात आढावा बैठकीत ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद झाला होता. या वादावर बोलताना “पोलिसांनी लगेच कोणती कारवाई केली नव्हती. त्यांचे काही लोकं कोर्टात गेलं आणि कोर्टानं नाकारलं. हायकोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. ते झाल्यानंतर पुढच्या गोष्टी घडल्या.”प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.

तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलेल्या खात्यावर निशाणा साधला. त्यांच्या मंत्रालयाकडून काय निधी मिळणार असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. “सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?. निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबाचं मंत्रालय देऊ शकतं. गडकरी साहेबांनी यापूर्वी निधी दिला आहे. काम पण चालली आहेत. या खात्याचं पूर्वी नाव अवजड खातं होतं. काही लोकं त्याला गंमतीने अवघड खातंही म्हणायचे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ENG vs IND 3rd Test Live | भारताला दुसरा धक्का, रोहित माघारी

कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी १ हजार ३६७ कोटींची तरतूद