in

डेक्कनच्या नदीपात्रात मगर आल्याची अफवा…

लोकशाही न्यूज नेटवर्क

पावसाळ्यामध्ये मगर नदीपात्रातून किंवा तलावामधून बाहेर रस्त्यावर आलेच्या अनेक घटना पाहायला मिळतात. पुण्यामध्ये अशाच एका घटनेने खळबळ केली आहे. डेक्कनच्या नदीपात्रात मगर आल्याची अफवा संपूर्ण पुण्यामध्ये परसली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले होते. यामुळे घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे व दहशतीचे वातावरण पसरले होते.

मोठ्या संख्येने पोलीस व जवान दाखल झाल्याने बघ्यांची एकाच गर्दी ऊसळली होती. अनेक व्यक्ती मोबाईलवर छायाचित्रीकरण करत असल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात उसळली होती. बघ्यांची होणारी गर्दी आणि पोलिसांचा फौजफाटा पाहून वनविभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते. सर्व तपासणी केल्यानंतर ही केवळ अफवा होती हा निकष निघाला. तरी नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनअधिकारी केले आहे.

या पूर्वी देखील महाडच्या सावित्री नदीतील मगरींच्या फेक व्हिडिओने मोठया प्रमाणात धुमाकूळ घातला होता. त्याच प्रमाणे कोल्हापूर कृष्णा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मगरी आढळतात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पालघरमध्ये पर्यटन विकास करून कुपोषणाची समस्या सोडवायची – मुख्यमंत्री

दिनेश त्रिवेदी यांचा खासदारकीचा राजीनामा की, 9 वर्षांची सल?