in

नाशिकच्या चांदेश्वरीत भाविकांची गर्दी

पर्यटन आणि धार्मिक ठिकाण असा दुहेरी संगम असलेल्या नाशिकच्या नांदगांव तालुक्यातील चांदेश्वरी येथे सध्या पर्यटकांची व भाविकांची गर्दी होत आहे.मात्र या गर्दीला शासनाने घालून दिलेले नियम अडसर ठरत आहे.

श्रावण महिन्यात प्रवाहित झालेला धबधबा बघण्यासाठी परिसरातील अनेक पर्यटक हमखास चांदेश्वरी येथे भेट देण्यासाठी येतात.तसेच धार्मिक दृष्ट्या महत्वाचे असलेले स्वयंभू असे प्राचीन काळातील शिवलिंग व त्या पिंडीलगत असलेले पाण्याचे मोठे कुंड व धबधबा हे बघण्यासाठी व दर्शनासाठी श्रावण महिन्यात भाविकांची मोठी रेलचेल असते.

मात्र सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद असल्याने भाविकांना या तिर्थक्षेत्रावर येण्यास मज्जाव करण्यात आला असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तरीदेखील भाविक परिसरात येतात व आपले श्रद्धास्थान असलेल्या चांदेश्वरी येथे दुरून दर्शन घेऊन परतत असतात. व्रत वैकल्याचा महिना म्हणून श्रावण महिन्याकडे बघितले जात असतांना शासनाने धार्मिक पर्यटन स्थळे व मंदिरे दर्शनासाठी खुली करावी अशी मागणी भाविक व पर्यटक करत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संत ज्ञानेश्वर महाराज परिसर फुलला… फुलांची मनमोहक आरास

सिरींज कमी असल्याने गोंदियात लसीकरणावर प्रश्नचिन्ह