in

“ज्यांनी देश घडवला त्यांचा सन्मान नरेंद्र मोदींनी केला पाहिजे ..”

राष्ट्रीय एकता दिवस सायकल रॅलीत नेहरुंचा फोटो वगळला, काँग्रेस नेत्या व मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली खंत

सूरज दाहाट
देशाच्या 75व्या स्वातंत्र्य वर्षाच्या पार्श्वभूमिवर तसेच 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिनाच्या अनुषंगाने 12 ऑक्टोंबरला गडचिरोली मधून निघालेली सीआरपीएफ जवानांची राष्ट्रीय एकता दिवस सायकल रॅली अमरावती जिल्ह्यात दाखल झाली आहे. अमरावतीत काँग्रेस नेत्या, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी रॅलीचे जंगी स्वागत केले.

दरम्यान मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो या रॅली व अभियानातुन वगळन्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्यांनी देश घडवला त्यांचा सन्मान नरेंद्र मोदींनी केला पाहिजे अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकुर यांनी व्यक्त केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

यंदा राज्यातील 40 बंद साखर कारखाने सुरु होणार

T20 World Cup: भारत -पाकिस्तान मॅचपूर्वीच भिडले क्रिकेटर