in

होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल; विशेष ट्रेन तीन तास उशीराने

होळीनिमित्त कोकणातील प्रवाशांसाठी आज मडगांव फेस्टिवल विशेष ट्रेन धावत आहे. मात्र हि विशेष ट्रेन तब्बल तीन तास उशिराने सुटल्याने प्रवाशांना मोठया मनस्तापाला सामना करावा लागला. असंख्य प्रवाशी दादर, ठाणेसह अन्य स्थानकात ताटकळत उभे राहिले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शुक्रवारी सकाळी ०१११३ मडगांव फेस्टिवल विशेष गाडी तब्बल तीन तास उशिराने सुटल्याने प्रवाशांना मोठया मनस्ताप झाला. सकाळी सव्वा सातच्या सुमारास सीएसएमटीमधून सुटणारी गाडी दहा वाजेपर्यत स्थानकामध्येच उभी होती. त्यामुळे सीएसएमटीसह दादर, ठाणे, पनवेल येथे गाडीची वाट पाहणारे प्रवासी ताटकळत राहिले.

कोकणातूनच ही गाडी मुंबईच्या दिशेने पोहोचण्यास उशीर झाल्याची माहीती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. मात्र या कारणामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजपा आमदार गणेश नाईकांच्या नातवाला मारहाण

Deepali Chavan Suicide ; कुटुंबियांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार