in

Corona Virus : महापौर म्हणतात, मुंबईत कोणत्याही क्षणी नाइट कर्फ्यू!

कोरोनाची दुसरी लाट आली असून त्याचा फैलावही मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुंबईत तर, सलग तीन दिवस नव्या रुग्णांची संख्या पाच हजारांच्या पुढेच आहे. अशा परिस्थितीत मुंबईमध्ये कोणत्याही क्षणी नाइट कर्फ्यू लागू शकतो, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

मुंबईत 24 मार्चला 5185, 25 मार्चला 5504 तर, 26 मार्चला 5513 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे त्यावर वेळीच नियंत्रण मिळविण्याचा मुंबई महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. यादृष्टीने कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन नागरिकांनी करावे. होळी सण साजरा करतानाही काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन महापौर पेडणेकर यांनी केले आहे.

महापालिकेने कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरही भर दिला आहे. लसीकरणाच्या जनजागृतीबाबत आपण कुठेही मागे नाहीत. उलट डोअर-टू-डोअर लसीकरण करता यावे, यासाठी आपण केंद्राला पत्र पाठवले आहे. केंद्राने आता याबाबत गाईडलाइन दिल्या तर लसीकरणाचा टक्का आणखी वाढवता येईल, असेही त्या म्हणाल्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…’बाबू’ करतात माणसांची होळी, मुंबईत संजय दिना पाटील यांनी झळकावले पोस्टर्स

ड्रीम्स मॉल आगडोंब : 15 दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे पालिका उपआयुक्तांना आदेश