in

पुण्यात पुन्हा संचारबंदी…नाईट कर्फ्युची कडक अंमलबजावणी

पुण्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता प्रशासनाने मोठा निर्णय घेतला. रात्री ११ ते सकाळी सहापर्यंत शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत विभागीय आयुक्त सौरभ यांनी संबंधित माहिती दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये हे निर्णय घेण्यात आले. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरात सोमवारपासून रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच, शाळा आणि महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहे. खासगी कोचिंग क्लासला दिलेली परवानगी देखील रद्द करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी असलेल्या अभ्यासिका या ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

मात्र जिल्ह्यांतर्गत वाहतुकीवर कोणतेही निर्बंध लादणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सध्या कार्यक्रमांसाठी २०० जणांना परवानगी देण्यात आली असून त्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच, सिंगल विंडोज सिस्टीमही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती, विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुख्यमंत्री संध्याकाळी ७ वाजता जनतेशी संवाद साधणार

पाकिस्तानात फडकणार भगवा