in

Cycle Girl Jyoti | सायकल गर्ल ज्योती पासवानवर वडिलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

सायकल गर्ल म्हणून देशात ओळख झालेल्या ज्योती पासवान या तरुणीचे वडील मोहन पासवान यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ज्योतीच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनला सुरुवात झाल्यावर वडिलांना सायकलवर बसवून गुडगांवमधून बिहामधील दरभंगा येथे आणले होते. हे वृत्त व्हायरल झाल्यानंतर ती चर्चेल आली होती.

गतवर्षी लागू केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे सर्वकाही बंद करण्यात आले होते. त्यावेळी कोरोनाची भीती आणि रोजगार गमावल्यामुळे लाखो लोकांनी शहरातून गावाच्या दिशेने पलायन करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये ज्योतीचाही समावेश होता. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील सिंहवाडामधील सिरहुल्ली गावातील १३ वर्षीय ज्योतीने लॉकडाऊनदरम्यान वडील मोहन पासवान यांना सायकलवर बसवून गुडगांव येथून आठ दिवसांचा प्रवास करून दरभंगा येथे आणले होते.

ज्योतीचे वडील मोहन पासवान यांच्या काकांचे निधन १० दिवसांपूर्वी झाले होते. त्यांचे श्राद्ध कार्य करण्याबाबत बैठक सुरू होती. ही बैठक संपल्यानंतर उठून उभे राहत असतानाच मोहन पासवान कोसळले आणि त्यातच त्यांच्या मृत्यू झाला. मोहन पासवान यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Video viral | सासू-सुनेच्या भांडणात निर्दयी आईकडून चिमुकल्याला मारहाण

विद्या बालनच्या ‘शेरनी’चा टीझर झाला रिलीज