in ,

राजापूर तालुक्यातील 13 गावांना सतर्कतेचा इशारा

कोकण किनारपट्टीवर धडकणाऱ्या तौक्ते वादळाच्या अनुषंगाने महसूल प्रशासनाने राजापूर तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील तेरा गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.या वादळाच्या अनुषंगाने तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी लोकांशी संवाद साधत किनारपट्टीवर तौक्ते वादळ घोंगावल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने नेमकी कोणती काळजी घ्यावी, याची माहिती दिली.

राजापूरचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांच्यासमवेत किनारपट्टीवरील गावांमध्ये बैठका घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेत सतर्क राहण्याचे आवाहन श्रीमती वराळे यांनी केले.समुद्र किनारपट्टीवील राजवाडी, नाटे, साखरीनाटे, आंबोळगड, वाडापेठ, कुवेशी, दळे, अणसुरे, सागवे, मिठगवाणे, जैतापूर, माडबन, कशेळी या गावांना प्रशासनाने धोक्याचा आणि सतर्कतेचा इशारा दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है’

तौत्के चक्रीवादळाचा दोन दिवस धोका