in

‘पप्पा लवकर या’, बेपत्ता जवानाच्या मुलीचा टाहो…

छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी चकमकीनंतर बेपत्ता असणाऱ्या कोब्रा कमांडर राजेश्वर सिंह कुटुंबीयांनी एकाच टाहो फोडला आहे. दरम्यान राजेश्वर सिंह यांच्या निरागस मुलीचा व्हिडिओ समोर आला आहे. वडीलांनी लवकर घरी परत यावेत यासाठी ती ओरडत आहे. हरवलेल्या जवानचे नातेवाईकही व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडिओ छत्तीसगडमधील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने शेअर केला आहे.

माओवाद्यांनी सोमवारी काही माध्यमांना बोलावले आणि बेपत्ता कमांडर त्यांच्या ताब्यात असल्याचा दावा केला. राजेश्वरसिंग यांना नुकसान पोहोचवणार नसल्याचे त्यांनी म्हटले. पण त्यांच्या सुटकेसाठी काही अटी घातल्या आहेत.

बेपत्ता कमांडरच्या पत्नीने पतीची सुरक्षित सुटका व्हावी यासाठी नक्षलवाद्यांची मागणी पूर्ण करण्याचे आवाहन केले. शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता मी माझ्या पतीबरोबर शेवटच्या वेळी संवाद साधला, असे पत्नीने सांगितले.

शनिवारी रात्रीपासून त्यांना सतत फोन करतेय पण त्यांनी कॉल उचलत नाही. ते हरवलेल्या यादीमध्ये असल्याचे नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले. त्यानंतर आम्ही शोध मोहीम राबवित आहोत असे सीआरपीएफकडून कळाले, अशी माहिती राजेश्वर पत्नीने दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वसई-विरारकरांवर कडक निर्बंध; पाहा नवीन नियमावली

बापरे ! मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवसांवर