गेल्या काही वर्षांपासून हॉटेल व्यवसाय वाढताना दिसत आहे. यात स्थानिक लोक आणि परप्रांतीय सुद्धा हॉटेल व्यवसाय चालू केले आहेत. तर ढाब्यांवर आमदार, खासदार यांच्या नावाने थाळ्या वाढल्या जात होते. तर सरपंच थाळी महाथाळी,बाहुबली थाळी असे अनेक प्रकारच्या थाळ्यावर खवैय्यांनी ताव मारला होता. सहकुटुंब अथवा मित्र मंडळींसह जेवायला येणारे या महाथाळीला पसंती देऊ लागले होते पण जरा विचार करा ताटातले चमचमीत पदार्थ संपविण्यासाठी जर तुम्हाला कोणी एक तोळ सोनं दिल तर..?ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.
उल्हासनगरमधील मिट अँन्ड इट या हॉटेल चालकाने चक्क खवय्यांना राजभोग महाराजा जम्बो थाळी संपवण्याचे चॅलेंज दिल आहे. शिवजयंतीचेचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या या राजभोग महाराजा थाळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात विविध प्रकारचे ३५ पदार्थ आहेत. त्यात चिकन, मटण, सात प्रकारचे मासे आणि अंड्यांचा समावेश आहे. एरव्ही तर ही एक थाळी सहजपणे चार-पाच माणसांना जेवणासाठी पुरते. मात्र एवढे पदार्थ ४५ मिनिटात एकट्याने खाऊन दाखवले तर त्याला एक तोळा सोने देण्याची घोषणा हॉटेल व्यवस्थापनाने जाहीर केली आहे.
चिकन आणि मटन बिर्याणीसह चार प्रकारचे भात, पापलेट, सुरमई, बांगडा, बोंबिल आदी सात प्रकारचे मासे, अंडी, चिकन लॉलीपॉप अशा सर्व मांसाहारी पदार्थांचा या थाळीत समावेश आहे. त्याशिवाय चार प्रकारचे पापड, सोलकढी, ताक, रोटी, भाकरी, घावणे, तंदुरी आदी प्रकार या थाळीत असतात या थाळीची किंमत फक्त अडीच हजार रुपये इतकी आहे.
त्यानंतर नव्याने खवैय्यांच्या सेवेत येताना त्यांनी या जम्बो थाळीवर एक तोळ्याची सुवर्ण मुद्रा जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली असून या ऑफरला खवय्यांनीही चांगला प्रतिसाद देण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे
सध्या उल्हासनगर परिसरात या थाळीची चर्चा जोरात सुरू आहे.
Comments
Loading…