in

Dadra & Nagar Haveli Bypoll | भाजपचा पराभव; शिवसेनेच्या कलाबेन डेलकर विजयी

दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या कलाबेन डेलकर विजयी झाल्या असून भाजपचा दारूण पराभव झाला आहे. तब्बल 50 हजाराच्या मताधिक्याने डेलकर विजयी झाल्या. शिवसेनेचा हा महाराष्ट्राबाहेरचा पहिलाच विजय असून या निमित्ताने शिवसेने महाराष्ट्राबाहेर विजयाचं खातं खोललं आहे.

 दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना संधी दिली होती. शिवसेनेच्या कलाबेन डेलकर, भाजपचे महेश गावित आणि काँग्रेसचे महेश धोदी यांच्यात तिरंगी लढत झाली. दादरा नगर हवेलीच्या जनतेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना विजयी केलं आहे. कलाबेन डेलकर यांना 1 लाख 16 हजार  834 तर भाजपच्या महेश गावित यांना 66 हजार 157 मतं मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा 50 हजार 677 मतांनी पराभव केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Diwali 2021 |चला तर लागा तयारीला

‘फटाके जरूर फोडा पण धूर काढू नका’, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांसह, राणेंना टोला