in

बिग बॉसच्या घरात दादूसचीच हवा

नुकताच मराठी बिग बॉसची दमदार सुरवात झाली आहे. मनोरंजन विश्वात सर्वाधिक टिआरपी खेचणारा कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. बिगबॉसच्या या घरात जाण्याचं अनेक दिग्गजांचं स्वप्न असतं. यंदाच्या सीजनमध्ये बिग बॉसच्या घरात दिसणार आहे मराठीचा बप्पी लहिरी अर्थात आगरी कोळी संगीताचा बादशाह दादूस आपल्याला पाहायला मिळणार आहे.

भिवंडीतील कामतघर येथील दादूस म्हणजे संतोष चौधरी यांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे. दादुस यांना लहानपणा पासूनच गायनाची आवड, दादूसच्या बाबांना देवींच्या गाण्याची आवड होती.देवीच्या जागरणातून ते गाणी सादर करत. त्याला आगरी भाषेत बायाची गाणी म्हणतात. गाण्याचा वारसा दादूसला बाबांकडूनच लाभला.

“आई तुझा लालुल्या” गाण्याने दादूस ही खरी ओळख मिळाली. लहानपणी दोन्ही पायांमध्ये अपंगत्व होतं मात्र आईने दादूसची सेवा केली आणि दादूसला दोन्ही पायांवर उभं केलं. बायांची गाणी, धौलगीते, कोळीगीते आदी लोकसंगीताचा बादशाह म्हणून दादूसची आज स्वतंत्र ओळख आहे. त्याचप्रमाणे दादूसचा पेहराव, डोळ्यावर काळा गॉगल, गळ्यात जाड्या सोन्याच्या चेन, पाचही बोटात अंगठ्या हा प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहिरी यांच्यासारखा असल्याने मराठीतील बप्पी लहिरी म्हणूनच दादूसला ओळखलं जातं. बप्पीदा हे दादूसचे संगीतातील आदर्श आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, महिला गंभीर जखमी

IPL 2021 च्या प्रक्षेपणावर तालिबानची बंदी