in ,

दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनची क्रिकेटमधून निवृत्ती

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी जलद गोलंदाज डेल स्टेनने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने काही वेळापूर्वीच स्वत:च्या अधिकृत ट्विटरवरुन याबाबतची माहिती देत हे जाहीर केलं. त्याने यावेळी काही आठवणीतील फोटो आणि आपलं स्टेटमेंट ट्विट केलं आहे.

डेल स्टेनने 2004 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर हळू हळू एकदिवसीय संघात मग टी-20 संघातही डेलनं स्थान मिळवलं. विशेष म्हणजे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जगातील काही खास बोलर्समध्ये स्टेनचादेखील समावेश होता.

३८ वर्षीय स्टेनने आफ्रिकेकडून ९३ कसोटी, १२५ वनडे आणि ४७ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने ९३ कसोटीत १ हजार २५१ धावा तर ४३९ विकेट घेतल्या आहेत. ५१ धावा देत सात विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. कसोटी त्याने ५ वेळा १० विकेट तर २६ वेळा ५ विकेट घेतल्या आहेत. १२५ वनडेत स्टेनने १९६ विकेट घेतल्या. ३९ धावा देत ६ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर टी-२० मध्ये ४७ सामन्यात ६४ विकेट त्याने घेतल्या आहेत. ९ धावात ४ विकेट ही त्याची टी-२० मधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अफगाणिस्तानच्या तरुणीने मृत्यूपुर्वी बनवलेला व्हिडीओ

‘मनसे’तर्फे दहीहंडी फोडून शासनाचा निषेध