in

‘गुलाब’नंतर ‘शाहीन’ चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्र, गुजरात किनारपट्टीवर पाऊस

बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) आलेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे (Gulab cylone Affect) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आंध्रप्रदेशसह, ओडिशा आणि महाराष्ट्राला अतिवृष्टीचा (Heavy Rainfall) फटका बसला आहे. हे संकट कायम असताना महाराष्ट्रासह (Maharashtra) गुजरात (Gujrat) राज्याला आणखी एका चक्रीवादळाचा धोका असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं (IMD Alert) दिला आहे.

बंगालच्या उपसागरात पाठोपाठ आता अरबी समुद्रात नवीन चक्रीवादळ तर गुलाब नंतर आता शाहीन चक्रीवादळ येतंय. नुकतेच बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळ धडकले असताना आता पुन्हा अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार अशी माहिती हवामान विभागाकडून नुकतीच जाहीर करण्यात आली.

तर हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात आज चक्रीवादळ तयार होऊन अरबी समुद्रात वेगाने प्रवास करत पाकिस्तान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.हे चक्रीवादळ गुलाब चक्रीवादळ पेक्षा अधिक तीव्र असेल तर याचा परिणाम म्हणून गुजरात व महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पैनगंगा नदीच्या पुरामुळे वाहतूक झाली ठप्प

BIGG BOSS मराठीतून ‘ही’ प्रसिद्ध स्पर्धक घराबाहेर, जाणुन घ्या कारण