in

गरोदर मातांचा जीवघेणा प्रवास;पुलाचे बांधकाम करण्याची होतेय मागणी

व्यंकटेश दुदमवार | गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील गरोदर मातांचा प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास सुरू आहे. नुकताच सुमित्रा नरोटे या गरोदर महिलेला स्वतःचा जीव धोक्यात टाकून प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागले. ही निव्वळ सुमित्रा नरोटे या एका गरोदर महिलेपूरती समस्या नसून गडचिरोलीतील असंख्य गरोदर मातांची ही समस्या आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन नदी-नाल्यावर पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी केली जात आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीला नुकतेच 39 वर्ष पूर्ण झाले. मात्र, या जिल्ह्यात दुर्गम भागातील गरोदर मातांचा जीव अजूनही धोक्यातच आहे. 31 ऑगस्ट मंगळवार ला एका गरोदर मातेला प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यासाठी गावकऱ्यांना त्या गरोदर मातेसह आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागले.

30 ऑगस्टच्या रात्रीपासून वेंगणुर येथील सुमित्रा नरोटे या गरोदर महिलेला अचानक प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या.गावात दवाखाना नसल्याने प्रसूतीसाठी 9 किमी अंतरावर असलेल्या रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्याशिवाय पर्यायही नव्हते. मात्र, रस्त्यावर मोठे नाले आणि नाल्यात साचलेला कन्नमवार जलाशयाचा पाणी यामुळे बोटीच्या सहाय्याने रात्रीचा जलप्रवास शक्य नसल्याने त्या गरोदर मातेला रात्रभर वेदना सहन करत ताटकळत पडून राहावे लागले. पहाटे गावकऱ्यांनी कसे बसे 9 किमी प्रवास करून प्रशासनाने दिलेल्या बोटीच्या सहाय्याने कन्नमवार जलाशय ओलांडले आणि रुग्णवाहितकेतून प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. सध्या तिच्यावर रेगडी येथे उपचार सुरू आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पक्के रस्ते, नदी-नाल्यावर पूल नसल्याने तसेच वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने वेळेवर उपचाराअभावी अनेक गरोदर मातांना जीव गमवावा लागला. या महिलेला सुद्धा उपचारासाठी रात्रभर वेदना सहन करूनही पहाटे नऊ किलोमीटरचा प्रवास करून कन्नमवार जलाशय ओलांडल्या शिवाय दवाखान्यात दाखल होता आले नाही. कदाचित उपचाराअभावी या महिलेचा जीवाला सुद्धा धोका झाला असता तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जात आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन रेगडी ते वेंगणुर रस्त्यावरील नदी-नाल्यावर पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी केली जात आहे.वेंगणुर आणि बोलेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले काही गावे तब्बल पाच महिने “नॉट रिचेबल” राहतात.

या भागातील नागरिकांना पावसाळ्यातील चार ते पाच महिने जीव धोक्यात टाकून जलप्रवास करावा लागत आहे त्यामुळे याठिकाणी पुलाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी येथील उपसरपंच नरेश कांदो आणि रेगडी येथील समाजसेवक प्रशांत शाहा व रवी दुधकोहरे तसेच परिसरातील नागरिकांनी केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वर्ध्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

अनुष्काचं लोकांना केले ‘हे’ आवाहन